Type Here to Get Search Results !

मराठवाड्याला दिलासा ! जायकवाडी धरणाची पाणीपातळी ३२.८० टक्क्यांवर पोहोचली

 मराठवाड्याला दिलासा ! जायकवाडी धरणाची पाणीपातळी ३२.८० टक्क्यांवर पोहोचली 


                                          ५१ हजार क्युसेक्स पाण्याची आवक,   


पैठण | महाराष्ट्र राज्य टाईम्स : नाशिक परिसरात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, दुतोंड्या मारुतीच्या वरून गोदावरीचे पाणी वाहत आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सुरू असलेल्या ८८ हजार ९३५ क्युसेक्स विसर्गापैकी सुमारे ५१ हजार क्युसेक्स पाणी जायकवाडी धरणात  शुक्रवार रोजी सकाळी दाखल झालेआहे. आज रोजी धरणाची  पाणीपातळी शुक्रवारी ३२.८० टक्क्यांवर पोहोचली असल्याची माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली .

पैठण तालुक्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाच  अल्प प्रमाण आहे . अद्यापही मुसळधार पाऊस धरण परिसरात झालेला नाही . मात्रजायकवाडी धरणात पाण्याची आवक अद्याप सुरू असल्याने आगामी काळात धरणाच्या जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासाठी ही अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी असून, धरणातील वाढत्या जलसाठ्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक क्षेत्राच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.


Post a Comment

0 Comments