बाबरगांव येथील श्री गुंड्या बाबा जीर्णोद्धारचा प्राणप्रतिष्ठा
गंगापूर | प्रतिनिधी : राहूल जाधव : १९६२ मध्ये तालुक्यातील तुर्काबाद येथून कानचे भक्त असलेले गुंड्या बाबा यांच्या दोन मूर्ती आणून तालुक्यातील बाबरगांव येथे श्री गुंड्या बाबा संस्थानचे जीर्णोद्धारचे ग्रामस्थांकडून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
यावेळी सुरेश व गीता सातपुते यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली कृष्णा मिस्त्री यांनी मूर्तीचा वटा बांधला, रामेश्वर सातपुते व कृष्णा मिस्त्री यांचे अमूल्य योगदान राहिले.
यावेळी तंटामुक्त अध्यक्ष अरुण पठाडे, संस्थापक अध्यक्ष मुरलीधर नाना सातपुते, संतोष सातपुते, दादाभाऊ सातपुते, हरी सातपुते, भाऊसाहेब दादा दंडे गणपत सातपुते, भागिनाथ सातपुते, परभत सातपुते. पूजा - देवळे गुरुजी. आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments